MCQ General info


MCQ Tests-लेखी चाचण्यासाठीचे उद्दिष्ट 

[टार्गेट]  :-  १००% score 

Subscribe to our YouTube channel :
https://www.youtube.com/channel/UCg_dD-EUZ3kfbVdKobuci-A

 

        तयारी कशी करावयाची:- 

  1. रोज कोणताही १ मराठी पेपर पूर्ण वाचा. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, लोकमत, तरुण भारत, सकाळ व सामना या सर्व दैनिकांच्या फ्री मोबाइल Apps उपलब्ध आहेत.  शक्यतो स्थानिक आवृत्ती वाचावी.  गेल्या ६ महिन्यातील  सर्व अंक वाचून काढा. लोकमत चे सर्व जुने अंक त्यांच्या App वर  उपलब्ध आहेत.
  2. राजकीय घटना आणि बातम्यांवर तसेच वादग्रस्त मुद्द्यांवर शक्यतो प्रश्न विचारले जात नाहीत.  म्हणून वस्तुस्थिती दर्शक [factual] बातम्यांवर लक्ष केंद्रित करा आणि त्याच्या notes काढा. मोबाईल वरील Notes  वा तत्सम App मध्ये आपण अश्या नोट्स अथवा बातम्या copy paste  करू शकता. 
  3. १० मित्रांच्या  Training ग्रुप  वर आपल्या notes पाठवा. कोणी कोठल्या विषयाच्या नोट्स  बनवून share करावयाच्या हे आधीच ठरवून घ्या.
  4. प्रश्नांचे विषय पुढीलप्रमाणे असतात.
  • पर्यटन स्थळे, यात्रा व मेळे, महत्वाची धार्मिक क्षेत्रे, नैसर्गिक विशेष स्थळे [जसे लोणार सरोवर, कोरीव लेणी, ई. ]
  • पर्यावरण, महत्वाची शहरे व तेथील industry, सार्वजनिक आरोग्य, साथीचे आजार, कोरोना महामारी इत्यादी 
  • महाराष्ट्राचा इतिहास,  समाज सुधारक,  स्वातंत्र्याच्या लढ्यातील महत्वाच्या आणि महाराष्ट्रात घडलेल्या घटना, 
  • संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, महाराष्ट्राच्या जडणघडणीतील महत्वाचे लोक - [उदा:- महाराष्ट्रातील संत जसे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानकाका, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम;   ऐतिहासिक महापुरुष जसे छत्रपती  शिवाजी महाराज ,  छत्रपती संभाजी महाराज , शाहू महाराज;  बाजीराव पेशवा;    स्वातंत्र्यसेनानी टिळक, आगरकर, चाफेकर बंधु;  समाजसुधारक  महर्षी कर्वे,  महात्मा फुले,  डॉ बाबासाहेब आंबेडकर,  समाजधुरिण जसे  यशवंतराव चव्हाण,  अण्णा हजारे, नाना शंकरशेट,  J R D टाटा, इत्यादी].
  • मराठी भाषेचे व्याकरण.  [SSC समकक्ष दर्जाचे]. 
  • ही  यादी केवळ illustrative आहे, exhaustive नाही.
  • वरील सर्व मुद्द्यांवरील प्रश्नांना  general knowledge  (GK)  म्हणतात. अश्या मुद्द्यांशी संबंधित माहिती वस्तुस्तिथीदर्शक आणि न बदलणारी  असते.    याउलट  General Awareness  (GA) चे प्रश्न सध्या घडणाऱ्या घटनांवर बेतलेले असतात.   वृत्तपत्रांच्या  वाचनातून  त्याची  उत्तरे  सहज  मिळतात. 
  • वरील विषय आपल्या १० जणांच्या ग्रुप मध्ये वाटून घ्या. प्रत्येकाने  केलेल्या नोट्स आपल्या Training ग्रुप वर share करा.  
  • माहितीसाठी https://vishwakosh.marathi.gov.in/ या संकेतस्थळाला [url-universal resourse locator] भेट द्या. या विश्वकोशात वरील बहुतांश  प्रश्नांची उत्तरे  मिळतील.  दुसरे महत्वाचे url  म्हणजे अत्यंत वेगवान सर्च असलेले मराठी विकिपीडिया https://mr.wikipedia.org/wiki/.  तिसरे महत्वाचे url म्हणजे https://en.wikipedia.org/wiki/  जेथून तुम्हाला इंग्रजीतील  wikipedia  वर जात येते.  ज्यांना हिंदी मध्ये search करावयाचे आहे त्यांनी हिंदी wikipedia  साठी https://hi.wikipedia.org/wiki/ या url वर जावे. त्यातील search  या window मधून तुम्ही पाहिजे ती माहिती शोधून काढू शकता. आताच तुमच्या मोबाइलला वर कोठलाही एक search करून बघा. 
  • लक्षात ठेवा कि एकदा याची सवय लागली कि कोणतीच माहिती तुमच्यापासून दूर नाही.  नवनव्या माहितीचा शोध करणे हि एक चांगली सवय आहे.  तुमचा मोबाईल आणि ही  ज्ञानाची ही कवाडे --- तुम्हाला साऱ्या जगाचे दरवाजे सताड उघडून देतील.   MPSC (Main) आणि  UPSC  ची तयारी देखील तुम्ही करू शकता.
  • या भरतीमध्ये प्रथम written test  आणि त्यानंतर physical test होणार आहे.  म्हणून MCQ ची  तयारी  आजपासूनच जोमाने सुरु करायला हवी.
  • सप्टेंबर २०२१ च्या मध्यास भरतीची  written test झाली तरी त्यापूर्वी तुम्हाला tests च्या तयारीसाठी किमान ८ आठवडे मिळतील [१९-७-२१ ते ११-९-२१]. एवढ्या कालावधीत लेखी व मैदानी अश्या दोन्ही चाचण्यांची उत्तम तयारी करता येणे शक्य आहे. लक्षात असू द्या की MCQ test १०० गुणांची असल्याने त्यातील यशावर बरेच काही अवलंबून राहील. MCQ  प्रकारच्या प्रश्नांमध्ये difficulty-level वाटेल तेव्हढी वाढवता येते. YouTube वरील MCQ tests बाबतच्या पहिल्या विडिओ मध्ये याचे उदाहरण [demo] दर्शविले आहे. YouTube चॅनेल वरील [SanjayBarveEAcademy] MCQ1 पोलीस भरती हा विडिओ पाहावा. 
    • चला तर.   आपला मोबाईल हेच आपले साधन.  त्याचा वापर टाइमपास करण्यासाठी न करता आपले करियर घडविण्यासाठी करा.   सरावासाठी तुम्हाला MCQ test पुरविल्या जातील.   त्यांचाही अभ्यास करा.

    • All the best ✌ 
    • ************************************************************************************************************************************

    Copyright Notice

    © 2021 Sanjay Barve E Academy
    Except as otherwise noted, the content of this page is licensed under CC BY-NC-SA 4.0 license.
    Suitable attribution along with the link to this website is required for use/reproduction of its content. If any additions and/or modifications are made, the same shall also be subject to, and governed by CC BY-NC-SA 4.0.